उरण : प्रतिनिधी
दिघोडे-वेश्वी गावाच्या हद्दीत असणार्या सिंघानिया गोदामात असलेला कांदा पूर्णपणे सडला आहे. या सडलेल्या व कुजलेल्या कांद्यात पडलेल्या किड्यांमुळे व त्यामुळे येणार्या भयानक दुर्गंधीमुळे वेश्वी, दिघोडे, आदिवासीवाडी व आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.