Breaking News

रेवदंडा बाजारपेठेतील रस्त्यावर शुकशुकाट

रेवदंडा ः प्रतिनिधी – कोरोनाशी मुकाबल्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा काम करीत असल्याचे चित्र दिसत असतानाच ग्रामस्थांनाही आता कोरोनाचे गांभीर्य लक्षात आल्याने रेवदंडा बाजारपेठेतील रस्त्यावर रहदारीविना शुकशुकाट दिसून येत आहे.

रायगड जिल्हाधिकार्‍यांनी दोन चाकी, चारचाकी वाहनांस पासव्यतिरिक्त फिरण्यास बंदी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले व विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या लोकांना घरातच बसून राहावे लागले. त्यामुळे आता लॉकडाऊनचे आवाहन प्रत्यक्षात उतरले असून रेवदंडा बाजारपेठेतील मुख्यः रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.

रेवदंडा पोलिसांनी रेवदंडा, पारनाका, चौलनाका, साळाव चेक पोस्ट, मोठे बंदर आदी ठिकाणी पोलीस तैनात करून चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे रस्त्यावर नाहक फिरणार्‍या रोडरोमिओंची संख्या रोडावली आहे. रेवदंडा बाजारपेठेत मात्र जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने, भाजीविक्री आदी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने दिलेल्या वेळेत सुरू आहे.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply