Breaking News

आदिवासींना धान्य वाटप

पनवेल : प्रतिनिधी

पनवेलचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे आणि खारघरच्या शाश्वत फाउंडेशनच्या वतीने नऊ आदिवासी वाड्यांवर आठ दिवस पुरेल एव्हढे धान्य वाटप करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंचे 275 किट मोठ्या गोण्या भरून आदिवासी वाडीवर नेण्यात आले. यामध्ये कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या दहा आदिवाशी वाड्यांवर सामानाचे वाटप करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत व त्यांच्या टीम, शाश्वत फाऊंडेशन यांचे सहकार्य या वेळी लाभले. या वेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा बिना गोगरी, जयेश गोगरी, पत्रकार संतोष ठाकूर, वैभव गायकर, छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर आदी उपस्थित होते.

कोरोनाशी लढाईसाठी आर्थिक हातभार

कर्जत ः बातमीदार

कोरानाविरोधात लढाईसाठी मदत म्हणून कर्जत तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने आपली एका दिवसाची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सव्वातीन लाखांची पेन्शनची रक्कम देऊन वेगळा पायंडा पाडला आहे. कर्जतमध्ये रायगड जिल्हा परिषदेत सेवा बजावणारे 453 सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना कर्जत पंचायत समितीच्या लेखा विभागाकडून पेन्शन अदा केली जाते. संघटनेचे अध्यक्ष रा. का. भवारे, उपाध्यक्ष गजानन म्हात्रे, सचिव अरुण मोकल आदी सर्व 453 सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी आपली एका दिवसाची पेन्शन कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली एक दिवसाची सव्वातीन लाखांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply