Breaking News

उरणकरांना रविवारीही होणार पाणीपुरवठा

आमदारांची पालकमंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक

उरण : वार्ताहर
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रानसई धरणातून उरण शहराकरिता दर रविवारी पाणीपुरवठा सुरू ठेवण्याबाबत  रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री  उदय सामंत यांच्यासमवेत शुक्रवार (दि. 3) सकारात्मक बैठक झाली.
या बैठकीस भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, उरण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, मुख्याधिकारी राहुल इंगळे, इंजिनिअर झुंबर माने उपस्थित होते.
पुढील रविवारपासून दर रविवारी पाणीपुरवठा सुरळीत असणार आहे. रविवारीही पाणी मिळणार असल्याने उरणच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply