Breaking News

तायक्वॉन्डोपटू रिहानने केली पदकांची लयलूट

पनवेल : रामप्रहर वृत्त

तिसरी मुंबई कोरियन कौन्सिल जनरल तायक्वॉन्डो स्पर्धा 9 व 10 नोव्हेंबर रोजी पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाली. या स्पर्धेत भारतातून 837 तायक्वॉन्डो खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात पनवेलमधील सर्वात लहान वयाचा खेळाडू रिहान रोशन ठाकूर याने घवघवीत यश संपादन केले. रिहानने वेगवान खेळाने फाईट प्रकारात सुवर्ण व फुमसे प्रकारात एक सुवर्ण, एक रौप्यपदक मिळविले.

रिहान ठाकूर हा गेली दोन वर्षे सातवी डिग्री ब्लॅक बेल्ट व आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांच्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण घेत आहे. रिहानला सहाय्यक मार्गदर्शन प्राजक्ता अंकोलेकर, रुपेश माळी, सदानंद लिंबरे, प्रभाकर भोईर यांचेही मार्गदर्शन आहे.

या यशाबद्दल रिहानवर अभिनंदनाचा वर्षात होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी रिहानचा कौतुक व सत्कार केला.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply