उरण : प्रतिनिधी
उरणमध्ये तहसीलदारांच्या अधिपत्याखाली अन्नदान पुरवठा मदत केंद्रात सोमवारी मजूर, झोपडपट्टीवासीय गरीब गरजू आणि गावाकडे निघालेल्या अशा सुमारे 2300 लोकांना 2500 क्विंटल धान्य वाटप करण्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. उरण तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या माध्यमातून तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निलम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उरणमध्ये तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान पुरवठा मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे.