
महाड : प्रतिनिधी
अन्न सुरक्षा मोहिमे अंतर्गत रोहा किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्रा मार्फत महाड तालुक्यातील आसनपोई येथे सामुहीक गळीतधान्य पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कृषी केंद्राचे विस्तार कृषी तज्ज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर व कृषी अभियांत्रिकी सुधाकर पाध्ये, डॉ. मनोज तलाठी यांनी शेेतकर्यांना मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन तुकाराम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आसनपोई गावातील प्रगतशील शेतकरी एकनाथ जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पारंपरिक भुईमुग लागवडीचे तंत्र तसेच सुधारित खत व्यवस्थापन करताना नत्र आणि स्फुरद यांची योग्य मात्रा व योग्य वेळी वापर याबाबत तसेच कोकण भूरत्न या जातीच्या बियाणाची माहिती डॉ. प्रमोद मांडवकर यांनी दिली. भुईमुग लागवडीबाबत ठिबक तंत्रशास्त्र व प्लास्टिक आच्छादन वापर योग्य ठरत असल्याचे सुधाकर पाध्ये यांनी सांगितले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाला आसनपोई आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.