पनवेल ः रायगड जिल्ह्यात गुरुवारी 56 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पनवेल मनपा 229, पनवेल ग्रामीण 60, उरण 10, खालापूर 3, कर्जत 7, पेण 10, अलिबाग 5, मुरूड 3, माणगाव 6, तळा 2, म्हसळा 11, महाड 15, पोलादपूर 7 अशी एकूण 368 झाली आहे. गुरुवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. दिवसभरात 69 रुग्ण कोरोनाविरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत पनवेल मनपा 596, पनवेल ग्रामीण 198, उरण 159, खालापूर 10, कर्जत 24, पेण 13, अलिबाग 36, मुरूड 13, माणगाव 46, तळा 10, रोहा 23, सुधागड 2, श्रीवर्धन 9, म्हसळा 18, महाड 2, पोलादपूर 13 अशा 1172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …