Breaking News

समद मुल्ला यांच्याकडून गरिबांना मदतीचा हात

उरण : वार्ताहर

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, सर्वत्र लॉकडाऊन  केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्‍यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे.अशा गरिबांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मुस्लीम मोहल्ला येथील राहणारे भाजपचे कार्यकर्ते समद मुल्ला व परिवार यांच्या वतीने बुधवारी 98 गरिबांना किराणा सामान देण्यात आले. यामध्ये तांदूळ, डाळ, खाद्यतेल, साबण आदी सामान देण्यात आले आहे. उरण शहरातील पीओ बेकरीजवळ, उरण चारफाटा झोपडपट्टी, साखरपीरजवळ असलेली झोपडपट्टी, नाईक नगर झोपडपट्टी येथील सुमारे 98 गरजूंना किराणा सामान देण्यात आले. या वेळी उरण मुस्लीम मोहल्ला येथील राहणारे भाजपचे कार्यकर्ते  समद मुल्ला, त्यांची मुले युसुफ मुल्ला, अहमद मुल्ला, लतीफ मुल्ला आदी उपस्थित होते. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने रोज काम करून हातावर कमावणार्‍यांचे काम बंद झाले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदतीचा हात देणे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रसंगाला मदत करणे म्हणजेच भुकेलेल्यांना घास देणे आपले कर्तव्य आहे, ते मी करीत आहे. ज्या ज्या वेळी अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा मी गरिबांना मदत करीत असतो, अशी प्रतिक्रिया समद मुल्ला यांनी व्यक्त केली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply