Breaking News

केअर ऑफ नेचर संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तू

उरण : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केअर ऑफ नेचर संस्थेच्या वतीने रानसई येथील बंगल्याची वाडी येथील 122 कुटुंबांना त्यांच्या निवासस्थानी पोहोचून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर अध्यक्ष स्नेहल पालकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस नाईक सचिन केकरे, पोलीस शिपाई शरीफ, फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, केअर ऑफ नेचरचे सेक्रेटरी महेश पाटील, नितेश मुंबईकर यांच्यासह आदिवासी बांधव या वेळी उपस्थित होते.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply