Breaking News

पोलिसांना फूड पॅकेट्स

पनवेल : वार्ताहर

कोरोना या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशा या परिस्थितीत पोलीस बांधव आपले कार्य करीत आहेत. पोलिसांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याने त्यांना शाम देवी माता ट्रस्ट तसेच हाजी शनवाज खान फाऊंडेशन यांच्या वतीने कामोठे येथील पोलीस ठाण्यामधील कर्मचार्‍यांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. शाम देवी माता ट्रस्ट तसेच हाजी शनवाज खान फाऊंडेशन हे गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी गोरगरीब लोकांना मदत करीत आहे. 14 एप्रिलपर्यंत असेच त्यांचे कार्य सुरू राहणार आहे, अशी माहिती शनवाज खान फाऊंडेशनचे अध्यक्ष शनवाज खान यांनी दिली. या वेळी शाम देवी ट्रस्टचे सिद्धू कांबळे, सुनी दवते, इस्लामचे अकील सय्यद, हिंदू मुस्लीम एकता गोंगाटचे शैनाज खान, शाम देवी ट्रस्टचे विजय पाल, धर्मेश शर्मा, समाजसेवक इरफान तांबोळी, समाजसेवक वसीम मस्ते, दिलीप पाल, अनिल शुक्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply