औषधांची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद
पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यात कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालीमध्ये शनिवारपासून नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देत रविवारी (दि. 16) दुसर्या दिवशीही औषधांची दुकाने सोडून कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
करोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी पालीमध्ये शनिवार (दि. 15) पासून रविवार (दि. 23) पर्यंत तब्बल नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. आमदार रविशेठ पाटील, तहसीलदार दिलीप रायण्णावार व भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी जनता कर्फ्यु यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालीतील सर्व व्यापारी व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पहिल्या दिवसाप्रमाणेच रविवारी दूसर्या दिवशीही सर्व आस्थापना व व्यवहार बंद ठेवून पालीतील व्यापारी व नागरिकांनी कडकडीत बंद पाळला.