पेण ः प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेण न. प.च्या वतीने न. प.समोरील रस्त्यावर निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले आहे.
न. प.च्या वतीने उभारण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण कक्षामधून स्वतः चालत जाऊन याचा लाभ घेत आमदार रविशेठ पाटील यांनी या कक्षाची पाहणी केली.
या वेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, हिमांशू कोठारी, आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते. कोरोना निर्जंतुकीकरण कक्षातून जाताना हात वर करून चालावे. चालताना वर बघू नये. कक्षातून जाताना डोळे बंद ठेवावेत. मास्क काढू नये. लहान मुलांची काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी या वेळी दिल्या.