सुधागड तालुक्यातील घटना
सुधागड : प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील मढाळी गावाजवळील एका बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी आलेल्या चार चोरांपैकी एक जण इन्व्हर्टरची अवजड बॅटरी चोरून नेत असताना पत्रा तुटून बॅटरीसह कोसळला आणि जबर जखमी झाला आहे. या प्रकरणी पाली पोलिसांनी तीन चोरांना पकडून अटक केली असून, चौथा जखमी चोर उपचार घेत आहे. मिथुन भोईर (वय 30), दिनेश जाधव (वय 26), लक्ष्मण वाघमारे (वय 33) आणि विजय हिलम (सर्व रा. मढाळी आदिवासीवाडी, ता. सुधागड) अशी या चोरट्यांची नावे असून, यातील विजय हिलम हा जखमी आहे. तो वगळता इतर तीन आरोपींना पाली न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.