Breaking News

सोल्वे ग्रुपकडून 1800 लिटर हॅण्डवॉश

अलिबाग ः जिमाका

सोल्वे ग्रुप रोहा यांच्याकडून नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनास सहकार्य म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे पाच लिटरच्या 360 बॉटल्स याप्रमाणे एकूण 1800 लिटर हॅण्डवॉश सुपूर्द करण्यात आले.

या वेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, सोल्वे कंपनीचे सिस्टीम सपोर्ट मॅनेजर अनिल तस्ते, आरोग्य, सुरक्षा व पर्यावरण व्यवस्थापक सतीश कुलकर्णी उपस्थित होते.

सोल्वे कंपनीने केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रशासनातर्फे त्यांचे आभार मानले आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply