Breaking News

कोरोनाचे सावट : यात्रा, पालख्या रद्द

उरण : रामप्रहर वृत्त – चैत्र महिना म्हटले की, गावागावात पारंपरिक यात्रा-पालखी उत्सवाला जल्लोषात सुरुवात होते. यंदा मात्र कोरोनाचे सावट यावर असणार आहे. त्यामुळे गावोगावचे जत्रोत्सव रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना आपापल्या घरातच पूजा करून देवीची आराधना करण्याच्या सूचना दिल्याच्या समजते.

उरण-पनवेल आता स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जात आहे. मात्र या आधुनिक शहरात आजही गावातील आपले गावपण जपत गावात पारंपरिक पद्धतीने सर्व सण म्हणजे गणेशोत्सव, होळी, रामनवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती बरोबरच दरवर्षी गावातील देवीच्या यात्रा व पालखी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. प्रत्येक गावातील मंदिरात तिथीनुसार वेगवेगळ्या दिवशी देवीची पूजा केली जाते. तिचा विशेष मानपान देऊन तिला सजवून पालखी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत काढली जाते. या दिवशी गावाबरोबर परगावातील भक्तगण बेधुंद होऊन नाचत असतात. यामध्ये प्रामुख्याने जसखार, न्हावा, गव्हाण, नवीन शेवा, करंजा, कोप्रोली या गावातील यात्रा व पालखी सोहळ्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात. या वेळी त्यांना मुकावे लागणार आहे.

गावात प्रत्येकाच्या घरासमोर पालखी आल्यानंतर आरती ओवाळत मानपान देत आशीर्वाद भक्तगण घेत असतात. काळानुसार बदल होत तिचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर होत असले तरी गावातील सण, यात्रा व पालखी सोहळा आजही पूर्वपार प्रमाणे त्याच उत्साहात व जल्लोषात साजरा होताना दिसत आहेत. या यात्रांकडे प्रत्येकाचे लक्ष लागलेले असते. मात्र यावेळी कोरोना व्हायरसने जगाला व देशाला वेठीस धरले आहे. या कोरोनाच्या सावटामुळे यंदाचे यात्रा व पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती शासकीय अधिकारी वर्गांनी दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply