पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरातील रेल्वे स्टेशनजवळील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री साई नारायणबाबा मंदिराच्या वतीने आजही गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे वाटप त्याचप्रमाणे 140 विधवा माता-भगिनींना पूर्ण महिन्याचे रेशन श्री साई नारायणबाबा यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावावर हातावर पोट असणार्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. नाका कामगार, झोपडपट्टी परिसर, विधवा माता-भगिनी यांना गेल्या काही दिवसांपासून श्री साई नारायणबाबा मंदिराच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. तसेच नारायणबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 11 लाख रुपये देणगी स्वरुपात देण्यात येणार आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दररोज 200च्या वर लोकांसाठी खिचडी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलीस बांधवांसाठीसुद्धा पाण्याची व्यवस्था, सॅनिटायझर, मास्कची व्यवस्था करण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना अशा प्रकारच्या मदतीची गरज असेल त्यांनी श्री साई नारायणबाबा मंदिरातील सदस्य राम थदानी (मो. 9820616390) यांच्याशी संपर्क साधावा.