Breaking News

एक दिवा एकात्मतेचा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उरण : वार्ताहर – कोरोनाला आपण निश्चित परतवुन लाऊ एक दिवा एकात्मतेचा, असा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला समस्त देशवासीयांनी प्रतिसाद दिला. रविवार (दि. 5) रात्री 9 वाजता 9 मिनिटे देश भारत सर्व ठिकाणी दिप प्रज्वलित करून कोरोना विरोधाच्या संघर्षात आणखी सकारात्मक शक्ती प्रदान केली.

उरण तालुकासह शहरात घरा-घरात, लाईट बंद करून,  ब्लॉक गॅलरीत व काहींनी टेरेस वर जाऊन दिवे लावले होते. काहींनी मोबाइल फ्लॅश लाईट लावले होते, तर काही ठिकाणी मेणबत्या लावण्यात आल्या होत्या, काही ठिकाणी दिवे लाऊन भारत माताकी जय अशाही घोषणा देतांना नागरिक दिसत होते. कोरोनाच्या लढाईत सारा देश एकत्र आल्याचे सर्वत्र दिसले, नियमित लाईट बंद ठेऊन जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद दिला.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply