Breaking News

ओबीसी नेते जे. डी. तांडेल यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

ओबीसी समाजाचे नेते आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. डी. तांडेल यांचा वाढदिवस येत्या सोमवारी (दि. 28) आहे. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जे. डी. तांडेल हे रायगड टॅक्स कन्सलटंट्स असोसिएशनचे अध्यक्ष, अखिल आगरी समाज परिषदेचे कार्याध्यक्ष, ओबीसी जनमोर्चा, ओबीसी संघर्ष समन्वयन समिती आणि पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे उपाध्यक्ष, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे खजिनदार, मासिक आगरी दर्पणचे कार्यकारी संपादक, आगरी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आणि रोटरी क्लब पनवेल सेंट्रलचे माजी अध्यक्ष आहेत.

सामाजिक कार्यात सक्रिय असणार्‍या तांडेल यांच्या वाढदिवसानिमित्त 28 फेबु्रवारी रोजी सकाळी 11 वाजता तळोजा एमआयडीसीतील परमशांतीधाम वृद्धाश्रमात फळवाटप आणि दुपारी 2 वाजता खांदा कॉलनीतील आगरी शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना हायजेनिक किटचे वाटप करण्यात येणार आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply