Breaking News

कर्जत तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदाची निवडणूक चुरशीची होणार

कर्जत : बातमीदार

शिरसे आणि पाथरज या कर्जत तालुक्यातील दोन ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका 24 मार्च रोजी होत आहेत. पाथरजमध्ये 10 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर   गेल्यावेळी बिनविरोध झालेल्या शिरसे ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्षानंतर प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने तेथील  निवडणुकीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी थेट सरपंच पदाच्या निवडणूकीत चुरस निर्माण झाली आहे. पाथरज ही कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून चार गावे आणि 16 आदिवासी वाड्याचा या ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे. तेथील 13 पैकी 10 जागांवरील सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. तेथील प्रभाग दोनमधील एका जागेवर कोणीही नामांकन अर्ज दाखल न केल्याने त्या जागेसाठी निवडणूक होणार नाही. उर्वरित केवळ दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. पाथरज ग्रामपंचायतीचे संरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. ज्योत्स्ना अंकुश घोडविंदे आणि हर्षदा काशीनाथ रसाळ यांच्यात थेट सरपंचपदासाठी सरळ लढत होत आहे. पाथरज ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमधून जयाबाई रसाळ, गणेश मांगे, कविता कांबडी, प्रभाग दोनमधून मंगल नागो पारधी, प्रभाग तीनमधून गुलाब निर्गुडा, नामदेव पारधी, प्रभाग चारमधून सुभाष सराई, भाग्यश्री सराई आणि प्रभाग पाचमधून सरिता डांगरे, ललिता लोहकरे यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. आता तेथील प्रभाग 2 आणि प्रभाग 5 मध्ये सदस्यपदाच्या प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होत आहे. नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिलेसाठी राखीव असलेल्या शिरसे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी विमल विलास डांगरे आणि आरती संदीप भोईर यांच्यात सरळ लढत होत आहे.तेथील सदस्यपदाच्या 9 जागांपैकी प्रभाग 2 मधून शोभा पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता 8 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात असून त्या सर्व जागांवर सरळ लढती होत आहेत.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply