Breaking News

नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या वतीने ना नफा ना तोटा तत्त्वावर भाजीपाला वितरण

खारघर : रामप्रहर वृत्त

कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य परिस्थितीत पंतप्रधान,  मुख्यमंत्री व प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या आव्हानाला अनुसरून नागरिकांनी घरातच बसने हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे आपणही सुरक्षित आपला परिवार व परिसरही सुरक्षित म्हणूनच आपल्या सेवेकरीता नगरसेविका नेत्रा किरण पाटील व भाजपा खारघर मंडलच्या वतीने ना नफा ना तोटा तत्वावर भाजीपाला पुरवठा करण्यात आला.

या भाजीपाल्याचा लाभ जवळपास 650 कुटुंबाना मिळाला सदर कामी सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी व सभासदाचे सहकार्य मिळाले वितरण करण्यासाठी भाजपा खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, किरण पाटील, भाजप उपाध्यक्ष दिलीप जाधव, भरत कोंढाळकर, संदीप एकबोटे, कुशल इंगळे, दिनेश यादव यांनी मेहनत घेतली. 650 कुटुंबांनी याचा लाभ घेतला. टोमॅटो, सिमला मिरची, कोबी, भेंड प्रति एक किलो, पालक एक जुडी, मिरची 250 ग्रॅम, अद्रक 100 ग्रॅम, कोथिंबीर एक जुडी, कडीपत्ता आणि तीन लिंबु हे सर्व फक्त 130/- रुपयात सोसायटीच्या गेट पर्यंत पोहचवण्यात आले.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply