Breaking News

दिशा पाटील, प्रसाद पाटील यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उरण : वार्ताहर

आमदार महेश बालदी यांच्या  मार्गदर्शनाखाली उरण पंचायत समिती सदस्या दिशा प्रसाद पाटील व विंधणे गावचे उदयोजक तथा भाजपा उरण तालुका सरचिटणीस प्रसाद (गंपूशेठ) रामचंद्र पाटील यांच्या वतीने मंगळवारी (दि. 7)विंधणे, बौधवाडा व विंधणे-कातकरीवाडी, कंठवली कातकरीवाडी येथील सुमारे 125 गरिबांना किराणा सामान देण्यात आले.

त्यात तांदुळ, डाळ, खायचे तेल, मसाला, हळद, आदी सामान देण्यात आले. विनोद नरसिंगानी यांच्याकडून 250 किलो तांदुळ देण्यात आले. या वेळी उरण पंचायत समिती सदस्या दिशा प्रसाद पाटील व विंधणे गावचे उदयोजक तथा भाजपा उरण तालुका सरचिटणीस प्रसाद (गंपूशेठ) रामचंद्र पाटील, विंधणे ग्रुप ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी कृष्णा पाटील, सदस्य सुरज शरद म्हात्रे आदी उपस्थित होते. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने रोज काम करून हातावर कमवणारे याचे काम बंद झाले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदतीचा हात देणे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रसंगाला मदत करणे म्हणजेच भुकेल्यांना घास देणे  आपले कर्तव्य आहे ते मी करीत आहे. ज्या-ज्या वेळी अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा आम्ही  गरिबांना मदत करीत असतो, अशी प्रतिक्रिया उरण पंचायत समिती सदस्या दिशा प्रसाद पाटील यांनी व्यक्त केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply