Breaking News

शब-ए-बारातची नमाज घरीच अदा करावी; अन्यथा कारवाईचा इशारा

पोलादपूर ः प्रतिनिधी

तालुक्यातील विविध गावांमधील मशिदी, दर्गा, कब्रस्तान आदी ठिकाणी एकत्र जमा होऊन शब-ए-बारातची नमाज अदा करण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र असे घडल्यास पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारान्वये कारवाईचा इशारा एका पत्राद्वारे दिला आहे.

पोलादपूर तालुका हद्दीतील सर्व मशीद ट्रस्ट प्रमुखांना उद्देशून असलेल्या या पत्रात देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व रायगड जिल्हाधिकार्‍यांकडून संचारबंदीचे आदेश पारित झाल्याचे नमूद केले आहे. पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी शब-ए-बारात उत्सवाच्या दिवशी मशिदीत नमाज अदा करणारे मौलाना तसेच सोबत दोन लोक घेऊन शब-ए-बारातची नमाज अदा करावी, तसेच कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नये, जेणेकरून गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव पसरणार नाही व शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाईल. तसे न आढळल्यास मशीद ट्रस्ट प्रमुखांना जबाबदार धरून त्यांना व सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार्‍यांविरोधात प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply