Breaking News

खवल्या मांजराची तस्करी करणारे दोघे महाडमध्ये जेरबंद

महाड : प्रतिनिधी

किल्ले रायगड परिसरात सांदोशी गावातील आदिवासीवाडीवर खवल्या मांजराची तस्करी करणार्‍या दोन जणांना महाड पोलिसांनी पकडले असून, अधिक तपासाकरिता त्यांना महाड वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या जंगल भागात गेल्या काही वर्षांत वन्यप्राण्यांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी रात्री सांदोशी गावात आदिवासीवाडीवर खवल्या मांजर बेकायदेशीर विक्रीसाठी नेत असल्याची खबर गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता, सुधीर शंकर पवार (वय 42, रा विन्हेरे) आणि बळीराम तुकाराम नलावडे (रा. रामदास पठार) हे खवल्या मांजराला विक्रीसाठी घेवून जात असल्याचे आढळून आले. त्यांना पकडण्यात आले.

-खवले मांजर बेकायदेशीर विक्रीसाठी नेत असताना दोघांना पोलिसांनी पकडले आणि वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. अधिक तपास सुरू असून, या दोन आरोपींना तपासाकरिता ताब्यात घेतले आहे. अंधश्रद्धेतून ही तस्करी केली जात असावी.

-प्रशांत शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply