Breaking News

जोरात आवाज करीत दुचाकी चालवणार्‍यांवर कारवाईची मागणी

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेल स्टेशन परिसरात काही तरुण लॉकडाऊन असताना दुपारच्या वेळात आपल्या दुचाकीचा जोरात आवाज करीत फेर्‍या मारीत असल्याने घरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास होत आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई  करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. रस्त्यावर कारण नसताना फिरण्यास बंदी असताना नवीन पनवेल स्टेशन परिसरातून विचुंबेकडे जाणार्‍या रस्त्यावर दोन दिवस दुपारी आपल्या दुचाकीचे जोरात आवाज करीत काही जण मुद्दाम फिरत असल्याचे दिसत आहे. त्याचा त्रास घरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना होत आहे. त्याचवेळी बिकानेर चौकात बसलेले पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई का करीत नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी याकडे लक्ष  देऊन लॉकडाऊन काळात अशाप्रकारे दुचाकी फिरवणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply