Breaking News

पनवेलमध्ये त्या तिघी नाट्यप्रयोग

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी व 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन या दिनाच्या औचित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. त्यानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखेच्या वतीने डॉ. शुभा साठे लिखीत, त्या तिघी या कादंबरी आधारीत ‘त्या तिघी’ हा एकपात्री नाट्यप्रयोग बुधवारी (दि. 26) पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला. या प्रयोगाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास सीएचएम महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नितीन आरेकर यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लाभली. तसेच या वेळी महापौर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, शामनाथ फुडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

शेल इंडिया मार्केट्स कंपनीच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करार पनवेल : रामप्रहर वृत्तशेल एम्प्लॉईज युनियनच्या मार्गदर्शनाखाली शेल …

Leave a Reply