Breaking News

हनुमान जयंती व्हर्च्युअल पद्धतीने साजरी

कराडे खुर्द ग्रामस्थांकडून अनोखा जन्मोत्सव

पनवेल : बातमीदार
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने धूमाकूळ घातला असल्याने लोक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे हनुमान जयंतीचा सोहळादेखील सगळीकडे रद्द करण्यात आला होता, परंतु पनवेल तालुक्यातील कराडे खुर्द या गावी भाविकांनी झुम अ‍ॅपवरून एकत्र येत जन्मोत्सव साजरा केला.
याबाबत आशिष वैद्य यांनी सांगितले की, आमच्या कराडे खुर्द येथील हनुमान जयंती उत्सवाला 135 वर्षांची अखंड परंपरा आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दोन महिने आधी ग्रामस्थांनी जन्मोत्सवाच्या आयोजनासंदर्भात सभा घेतली होती, मात्र त्यानंतर महिन्याभरातच कोरोना या विषाणूरूपी आपत्तीने शिरकाव केला. त्यामुळे उत्सव रद्द करण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला. परिणामी सारेच हिरमुसले होते, परंतु गावात आणि मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध ठिकाणी नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्याला असलेल्या तरुण ग्रामस्थांनी एकमेकांशी संपर्क साधून झुम अ‍ॅपवरून हा उत्सव व्हर्च्युअल पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार एक ग्रुप बनविण्यात आला.  
हनुमान जयंतीच्या दिवशी जो जिथे आहे त्याने तिथेच राहून या उत्सवात उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रथेप्रमाणे कीर्तन, आरती, भजन रंगले. मरकजच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष एकत्र न जमताही एकोप्याचा आनंद घेत ध्येय साध्य करता येते हे कराडे खुर्द येथील ग्रामस्थांनी आपल्या उपक्रमातून दाखवून देत आदर्श ठेवला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply