पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब, गरजू व्यक्तींना दोन वेळचे चांगले अन्न पुरवण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना सुरू करण्याचा संकल्प राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत घेण्यात आला होता. त्यानुसार नुकताच या उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला.
कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर आर्थिक परिणाम झाला असून काहींवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. याची जाणीव ठेवूनच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मागर्दर्शनानुसार व महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या सोबतीने महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार व आशा कि किरण फाऊंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांच्या साथीने हा उपक्रम सुरू करण्यता आला.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत सुरू असलेल्या कामांचे कौतुक केले. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, आशा की किरण फाऊंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी, कोकण संध्याचे संपादक दिपक महाडिक, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा, अनुराग वाघचौरे, ओमकार महाडिक, रहीस शेख, सतीश झेंडे, बबन बारजगे, आशिष गुप्ता यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.