Breaking News

रामशेठ ठाकूर विद्यालयात वादविवाद स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 14) हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी भाषेचे महत्त्व वाढावे म्हणून 1953पासून भारतभर 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जाऊ लागला. वादविवाद स्पर्धेचे आयोजन म्हणजे विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता विकसित करणे हा या स्पर्धेचे मुख्य उद्देश होता. त्यासाठी त्यांना विषय ही तसेच देण्यात आले होते. विध्यार्थीयो का पोशाख, ऑनलाइन अथवा ऑफलाइन शिक्षा आत्मरक्षा का प्रशिक्षण हर नागरिक को देना चाहिये?, भारत मैं आरक्षण व्यवस्था समाप्त करनी चाहिये?, असे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून मुलांनी आपले विचार व्यक्त करून स्पर्धा रंगतदार केली. या कार्यक्रमात प्राचार्या निशा नायर मॅम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन 12वी विज्ञान शाखेच्या समृद्धी आणि तनिष्का यांनी केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply