Breaking News

अबोली महिला रिक्षा संघटनेला मदत

पनवेल : वार्ताहर

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच व्यवसायांवर त्याचा परिणाम झालेला आहे. अबोली रिक्षा महिला चालक या रिक्षा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र या लॉकडाऊन च्या काळात रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

अबोली महिला रिक्षा चालकांच्या नेहमीच त्यांचा आधारस्तंभ बनून पाठीशी राहणार्‍या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी ही समस्या ओळखून सेवाभावी संस्थेच्या मदतीने पनवेल मधील अबोली रिक्षा चालक महिलांसाठी अन्नधान्य वाटप केले. यावेळी पनवेल आरटीओ कार्यरत अधिकारी धनराज शिंदे, प्रशांत शिंदे, आशिष गरगुडे आणि अबोली रिक्षा चालक महिला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत उपस्थित होते. या वेळी महिला रिक्षा चालकांबरोबरच पुरुष रिक्षा चालक, टेम्पो चालक व इतर गरीब गरजुंना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये जापनीज इन्सेफेलाइटिस लसीकरण कार्यक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 1 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व …

Leave a Reply