Breaking News

क्रांतिकारी सेवा संघातर्फे गरजूंना मदत

पनवेल : कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगारापासून दूर रहावे लागत आहे, अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटूंबिय उपाशी राहू नयेत यासाठी क्रांतिकारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नामदेवशेठ  फडके यांच्या हस्ते तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंची मदतकार्य सुरु केले. आजपर्यंत एक हजार 500 हुन अधिक कुटुंबियांना या जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या आहेत. यामध्ये विहीघर येथील गरजू व गरीब विटभट्टी कामगार, मालडुंगा, ताडपट्टी, आदिवासी ठाकुरवाडी, धामनी येथील गरीब, गरजू, विटभट्टी कामगार, वावर्ले येथील आदिवासी कातकरी वाडी, ठाकूरवाडी, कर्जत तालुका येथील सालवड आदिवासीवाडी, वाकडी येथील आदिवासी कातकरी वाडी यांचा समावेश आहे. या वेळी नरेंद्र भोपी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महागणपतीला भक्तांचे साकडे

उरण : सार्‍या जगावर कोरोनाचे संकट असल्याने आज सर्व मंदिरे कुलूपबंद केली आहेत. त्या अनुरूप चिरनेर महागणपतीचेही मंदिरही बंद आहे. संकष्टी चतुर्थी आणि भक्तांची गर्दी हे नेहमीचे समीकरण ठरलेले. मात्र शनिवारचा दिवस त्याला अपवाद ठरलाय. मंदिरात येणारे भाविक केवळ देवाचे मुखदर्शन घेऊन माघारी जात होते. नित्यनेमाने गणेश चरणांशी नतमस्तक होणार्‍या भक्तांना असे माघारी जाताना बघून देवालाही वाईट वाटत असेल. पण महागणपती भक्तांच्या हाकेला धावणारा असल्याने त्याची कृपादृष्टी होऊन कोरोनाचे संकट नक्कीच दूर होईल आणि गणेशभक्तांना श्रीचरणांसी लवकरच नतमस्तक होता येईल हे नक्की… देवा तू सुखकर्ता… तू दुःखहर्ता… सर्व विघ्न लवकर दूर कर रे देवा, असे साकडे भक्तगणांनी महागणपतीला घातले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply