पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 12) 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 408 नव्या बाधितांची नोंद झाली. दुसरीकडे दिवसभरात 345 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 189, ग्रामीण 50) तालुक्यात 239, अलिबाग 27, खालापूर 25, रोहा 23, पेण व माणगाव प्रत्येकी 19, उरण 14, कर्जत 13, महाड 12, मुरूड आठ, सुधागड तीन, म्हसळा व पोलादपूर दोन, तळा व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात नऊ, उरण चार, पेण, माणगाव, म्हसळा, महाड व पोलादपूर प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 19,706 आणि मृतांची संख्या 542 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 15,680 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3484 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper