पनवेल : वार्ताहर
श्री साई नारायणबाबा पनवेल व भगवती साई संस्थानतर्फे करंजाडे येथील हातावर पोट असलेल्या माता-भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे. गेल्या 20 दिवसापासून श्री साई नारायणबाबा संस्था पनवेलच्या मार्फत वेगवेगळ्या गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. करंजाडे येथील काही माता-भगिनींना अशाच प्रकारे जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्याची माहिती पत्रकार व स्थानिक रहिवाशी सोनल नलावडे तसेच पत्रकार संजय कदम यांनी संस्थेकडे देताच त्यांनी तातडीने सदर कुटुंबियांसाठी आवश्यक असणार्या वस्तू एकत्रित करून करंजाडे सेक्टर 5 येथे संस्थेचे पदाधिकारी राम थदानी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यापुढे सुद्धा कुणाला गरज असल्यास संस्थेमार्फत करण्यात येईल अशी माहिती राम थदानी यांनी या वेळी दिली आहे.