पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निराधार कुटुंबांना करण्यात आले.
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने सुमारे 35 हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. समितीच्या वतीने ज्यांना ज्यांना शासनाची कोणतीही मदत पोहोचली नाही ज्यांना कुठूनही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा झाला नाही अशा कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी कोळवाडी येथे करण्यात आले. हा कार्यक्रम करीत असताना सामाजिक अंतर ठेवून वाटप करण्यात आले प्रत्येक कुटुंबाला तांदूळ, तेल, डाळ, कांदे, बटाटे, लसुन असे जीवनावश्यक वस्तू देऊन किमान काही दिवस त्यांचे पोट भरेल असे धान्य देऊ केले आहे. या कार्यक्रमास पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस मंदार दोंदे, कार्याध्यक्ष संजय कदम, खजिनदार केवल महाडिक, समितीचे सल्लागार दीपक महाडिक, समितीचे ज्येष्ठ सभासद विवेक पाटील, मयूर तांबडे, संतोष सुतार, अॅड. मनोहर सचदेव, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक संतोष पाटील, हरीग्राम ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण पाटील मा. सरपंच अमित म्हात्रे, मा. सरपंच नरेशभाई पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेश जाधव, अलंकार पाटील, नितेश पाटील आदी उपस्थित होते. या वेळी श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. मनोहर सचदेव, उपाध्यक्ष उमेश सचदेव, सेक्रेटरी मनोज देढिया, खजिनदार गोपाळ गिडवानी यांचे पनवेल तालुका संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.