नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपा क्षेत्रातील कंत्राटी व कायम कर्मचार्यांना विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांकडे निवेदन दिले आहे.
नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूची होऊ नये याकरिता संपूर्ण देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया लॉकडाऊनचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, पनवेल महानगरपालिकेचे कायम व कंत्राटी अधिकारी कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका व इतर कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालून, कर्तव्य बजावीत असून, ज्याप्रमाणे पूर्ण महानगरपालिकेने जर या कर्मचार्यांना कोरोना व्हायरसची लागण होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यांना रुपये एक कोटींचा विमा कवच उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या कायम व कंत्राटी अधिकारी कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका व इतर कामगार कर्मचार्यांना ही या प्रमाणे विमा कवच उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आयुक्तांकडे निवेदन देवून केली आहे.