Tuesday , March 28 2023
Breaking News

एनआयई सुपर लीगमध्ये ‘सीकेटी’ची चमक

पनवेल : रामप्रहर वृत्त :‘एनआयई’ या इंग्रजी वृत्तपत्राने घेतलेल्या सुपर लीगमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयाच्या (इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

स्पर्धेत साहिल म्हात्रे (इयत्ता चौथी), पूजा नामे (इयत्ता पाचवी), निमिषा महेश काशीद (इयत्ता सहावी), वेदांत प्रमोद पाटील (इयत्ता सातवी), तन्वी सावंत (इयत्ता आठवी), ईशा हितेंद्र सुपे (इयत्ता नववी) या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. यातील साहिल आणि ईशा या विद्यार्थ्यांना एनआयईतर्फे टॅब; तर इतर विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.

इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी, तसेच जगातील घडामोडींविषयी सजग राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वृत्तपत्राचे वाचन करणे आवश्यक आहे. म्हणूनच आमच्या विद्यालयात एनआयई या वृत्तपत्राचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाते, तसेच या वृत्तपत्रातर्फे आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये आमचे विद्यार्थी उत्साहाने भाग घेऊन नेहमीच अव्वल ठरतात, असे याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply