पनवेल : वार्ताहर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त विधाता फाऊंडेशन यांच्या वतीने कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी विधाता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन गायकवाड सचिव पत्रकार पंचशील शिरसाट, सहचिटणीस सुनील भोईर, उपाध्यक्ष जमिल खान, सुभाष गायकवाड, खजिनदार विनोद गायकवाड, बबन भोईर, रूपेश कांबळे, महेंद्र गायकवाड, मोबेन शेख, धिरज पाटील, शारुख खान, विक्की धनवडे तसेच अनेक रक्तडोनर्स यांनी रक्तदान केले.
राज्य सरकार यांच्या आदेशाप्रमाणे पालन करून गर्दी न करता प्रत्येक रक्तदात्याने आपल्यात अंतर ठेवून महाभयानक कोरोनाच्या संकटाला दुर ठेवून छान उपक्रम राबवला. या वेळी रुग्णालयाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. रक्ताचा अपुरा पुरवठा असल्याची माहिती पत्रकार शिरसाट यांना एमजीएमच्या पदाधिकार्यांनी दिली. ह्या समस्येबाबत संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.