उरण : वार्ताहर
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र अहोरात्र सेवा बजावत आहेत. देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हे कर्मचारी देवदूतच ठरले आहेत. या देवदूतांना केमिस्ट असोसिएशन उलवे संघटनेच्या वतीने एनआरआय पोलीस व न्हावा शेवा पोलीस यांना बिसलेरी मिनरल वॉटर, मास्क, सॅनिटायझर आणि इलेक्ट्रॉल सॅनिटायझर यांचे नुकतेच वाटप करण्यात आले.
याकरीता केमिस्ट असोसिएशन उलवेचे मेंबर्स (केमिस्ट) 4एस मेडिकल, पल्लवी मेडिकल, लिवलाइफ केमिस्ट, दिपक मेडिकल, एसएस मेडिकल, आराध्या मेडिकल, स्टार केमिस्ट, आइडियल मेडिको, अशोका केमिस्ट, महालक्ष्मी मेडिकल, एमव्हीएस हेल्थकेयर, बालाजी मदनुरे, शारदा फार्मेसी, श्री विठ्ठल कृपा मेडिकल, सद्गुरु मेडिको, जनता मेडिकल, पल केमिस्ट, एसजेएम मेडिकल, श्री गजानन मेडिकल, मेडिलाइफ मेडिको, अॅड. प्रतिभा पाटील व एनआरआय पोलीस व न्हावा शेवा पोलीस यांचे सहकार्य मिळाले.
पोलिसरूपी देवदूतांना केमिस्ट असोसिएशन उलवेच्या सर्व मेंबर्सकडून त्यांच्या या अहोरात्र सेवेचे आभार मानून, ही कोरोनाची लढाई आपण सर्वजण मिळुन जिंकु असे मत उलवे केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षा सीमा पाटील यांनी व्यक्त केले. स्वत:चे आरोग्य सांभाळून इतरांच्या आरोग्यासाठी ही लढाई लढायची आहे. त्यामुळे हे वाटप करताना सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेतली, सोशल डिस्टन्सिंग ठेऊन साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी न्हावाशेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस हवालदार भोसले, घोडके, गायकवाड, उलवे केमिस्ट असोसिएशन अध्यक्षा सीमा पाटील, उपाध्यक्ष गोविंद जाधव, सेक्रेटरी रवींद्र हरिजन, अॅड. प्रतिभा पाटील(लीगल सल्लागार) सदस्य दिलीप ठाकूर आदी उपस्थित होते.