खोपोली : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी खालापुरात विशेष काळजी घेण्यात येत असून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्यावर अत्यावश्यक सेवा पुरविणार्या वाहनचालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमध्ये शासनाच्या परवानगीने अत्यावश्यक सेवा देणारी वाहने फक्त रस्त्यावर धावत आहेत. शासनाकङून करण्यात आलेल्या टोलमाफीमुळे वाहनचालक मुंबई-पूणे एक्स्प्रस वेचाचा वापर करीत आहेत. या मार्गावरून ये-जा करणार्या वाहनचालकांना खालापूर टोलनाक्यावर थांबवून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. खालापूर तालुका आरोग्य अधिकारी पी. बी. रोकडे व त्यांचे वैद्यकीय पथक टोलनाक्यावर आलेल्या वाहनचालकांची आवश्यक ती आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांचे नाव, ठिकाण तसेच मोबाइल क्रमांक नोंदवून ठेवत आहेत. यामध्ये सावरोली ग्रामपंचायतीचा एक कर्मचारी, पोलीस आणि डॉक्टरांचे पथक टोलनाक्यावर तैनात राहून कर्तव्य बजावत आहे.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …