Breaking News

कोकण विभागात 95 अलगीकरण; 178 विलगीकरण कक्ष सज्ज

नवी मुंबई : विमाका

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता शासनामार्फत  विविध उपायोजना करण्यात येत आहेत. कोरोना बाधित किंवा संशयीत रुग्णांचे अलगीकरण (आयसोलेशन) करण्यासाठी कोकण विभागाअंतर्गत जिल्ह्यांमधील एकूण 95 हॉस्पिटलांना अलगीकरण केंद्र (आयसोलेशन सेंटर) व 178 विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन सेंटर) म्हणून घोषित करण्यात आले आहे. इस्पीतळांमधील वैद्यकीय व्यवस्था वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला देण्यात आलेल्या मार्गदर्शनात निश्चित करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमधील बेडची संख्या, ऑक्सिजन व्यवस्था व व्हेंटिलेटर्सची संख्या  या मार्गदर्शन सूचित दिल्यानूसार तपासण्यात आलेली आहे.

या अलगीकरण केंद्रांमध्ये एकूण 5 हजार 981 रुग्णांच्या अलगीकरणाची क्षमता आहे तर विलगीकरण केंद्रांमध्ये एकूण 8 हजार 318 रुग्णांच्या विलगीकरणाची क्षमता आहे. आतापर्यंत विविध अलगीकरण केंद्रांमध्ये एकूण दोन हजार 275 रुग्णांच्या अलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विलगीकरण केंद्रांमध्ये एकूण 854 रुग्णांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.           

कोकण विभागात आतापर्यंत फक्त 32 रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहेत. पुढील दिवसांत व्हेंटिलेटरची आवश्यकता वाढल्यास तसे पुरेसे व्हेंटिलेटरर्स तयार आहेत, अशी माहिती दौंड यांनी दिली. आवश्यक तेथे खाजगी वैद्यकीय अधिकारी तपासणीसाठी तात्पुरत्या स्वरुपात महानगरपालिका स्तरावर नियुक्त करण्यात आले आहेत.

-लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांची भोजनाची सोय

नवी मुंबई : कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ल सुमारे 52 हजार 577 मजूरांच्या निवार्‍याची व जेवणाची व्यवस्था 569 मदत शिबिर (रीलीफ कॅम्प) शासनामार्फत व स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने केली आहे, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली. अडकलेल्या मजूरांना राहण्यासाठी व त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एकूण 569 मदत शिबिर (रीलीफ कॅम्प) तयार करण्यात आले आहेत. त्यांना एकवेळचा नाश्ता व दोन वेळच्या जेवणासह औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. या मजूरांव्यतिरीक्त विभागातील एकूण 61 हजार 63 मजूर व गोरगरीबांना एक वेळचा नाश्ता व दोन वेळचे जेवण प्रशासन देत आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply