Breaking News

उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात येवा

‘कोरे’तर्फे विशेष रेल्वे गाड्या

मुंबई : प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या सुटीसाठी कोकणात जाणार्‍या प्रवासी, तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य, तसेच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे 5 एप्रिलपासून एकूण 60 विशेष मेल, एक्स्प्रेस विशेष भाडे आकारून चालविण्यात येतील. पनवेल ते सावंतवाडी आणि पुणे ते सावंतवाडीदरम्यान या विशेष जादा मेल, एक्स्प्रेस धावतील.

गाडी क्रमांक 01411 पुणे ते सावंतवाडीच्या विशेष 10 फेर्‍या होतील. 5 एप्रिल ते 7 जूनपर्यंत दर शुक्रवारी पहाटे 4.55 वाजता ही गाडी पुण्याहून सुटेल. गाडी 01412च्या सावंतवाडी ते पुणे विशेष 10 फेर्‍या होतील. 7 एप्रिल ते 9 जूनदरम्यान दर रविवारी ती रात्री साडेआठ वाजता सावंतवाडीहून सुटेल. लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ येथे गाडीला थांबा असेल.

पर्यटकांसाठी विशेष गाड्या

उन्हाळ्यातील सुटीकालीन दिवसांत रेल्वे प्रवासात अधिक गर्दी होते. म्हणून पर्यटकांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येतील. सीएसएमटी आणि पुण्याहून कोचुवेली, एर्नाकुलम विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 01065 सीएसएमटी ते कोचुवेली (साप्ताहिक) गाडी 15 एप्रिल ते 3 जूनपर्यंत चालविण्यात येतील. सीएसएमटीहून ही

गाडी सकाळी 11.5 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 01066 कोचुवेली ते सीएसएमटी 16 एप्रिल ते 4 जूनपर्यंत चालविण्यात येतील. कोचुवेलीहून ही गाडी रात्री 11 वाजता सुटेल. गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव, कारवार, कुमठा, मुरुदेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, कुंदापूर, उडुपी, मुल्कि, सूरतकल, मंगळुरू, कासारगोड, कण्णुर, कोषिक्कोड, षोरणूर, तृश्शूर, आलुवा, चेर्थला, अलप्पुळा, कायाम्कुलाम, कोल्लम या स्थानकांवर थांबा आहे.

सावंतवाडी ते पनवेल 20 फेर्‍या

गाडी क्रमांक 01413 पनवेल ते सावंतवाडीच्या विशेष 20 फेर्‍या चालविण्यात येतील. 6 एप्रिलपासून ते 9 जूनपर्यंत दर शनिवारी, रविवारी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी ही गाडी पनवेलहून सुटेल. गाडी क्रमांक 01414 सावंतवाडी ते पनवेलच्या 20

फेर्‍या चालविण्यात येतील. 5 एप्रिल ते 8 जूनपर्यंत दर शुक्रवारी, शनिवारी रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी ही गाडी सावंतवाडीहून सुटेल. या गाडीला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांत थांबा देण्यात येईल.

हमसफर गाडीचीही सोय

गाडी 01467 पुणे ते एर्नाकुलम (साप्ताहिक) हमसफर विशेष गाडी 15 एप्रिल ते 3 जूनपर्यंत चालविण्यात येईल. ती संध्याकाळी 7.55 वाजता पुण्याहून सुटेल. गाडी क्रमांक 01468 एर्नाकुलम ते पुणे (साप्ताहिक) हमसफर विशेष गाडी 17 एप्रिल ते 5 जूनपर्यंत चालविण्यात येईल. ती दुपारी 12.25 वाजता एर्नाकुलमहून सुटेल. गाडीला चिंचवड, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव, कारवार, कुमठा, मुरुदेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, कुंदापूर, उडुपी, मुल्कि, सूरतकल, मंगळुरू, कासारगोड, कण्णुर, कोषिक्कोड, षोरणूर, तृश्शूर, आलुवा या स्थानकांवर थांबा आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply