Breaking News

‘नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी पनवेल महापालिका कटिबद्ध’

कळंबोली : बातमीदार

कोरोना महामारीच्या काळात पनवेल महापालिकाच्या प्रशासनाने व कर्मचारी वर्गाने मोठे योगदान देऊन उल्लेखनीय काम केले आहे. पनवेल महापालिका नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास आयुक्त गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषद व्यक्त केला.

महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नोडमध्ये महापालिकेचे सुसज्य विभागीय कार्यालय करण्यासाठी महापालिकेचे काम सुरू आहे. आगामी काळात जरी तिसरी कोरोनाची लाट आली तरी त्याला समर्थपणे सामोरे जाऊन नागरिकांच्या आरोग्याचे व जीविताचे रक्षण करण्यासाठी पनवेल महापालिका प्रशासन सज्ज असल्याचेही आयुक्त देशमुख यांनी या वेळी सांगितले.

पनवेल महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या सभागृहात दीपावलीनिमित्त अल्पोपहाराचा कार्यक्रम पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आला होता. या वेळी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते. आयुक्त गणेश देशमुख यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन महापालिकेला देत असलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केला. या वेळी दिलखुलास चर्चा करीत असताना पनवेल महापालिका क्षेत्रांमध्ये जनतेला चांगल्या सुख सुविधा मिळण्यासाठी पनवेल महापालिका प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांना उत्तम व चांगल्या सुविधा देण्यासाठी महापालिकेचा विशेष प्रयत्न असणार आहे.

महापालिकेत येणार्‍या प्रत्येक नागरिकाला आदराची वागणूक मिळावी व त्याचे काम कार्यतत्परतेने व्हावे यासाठी प्रशासनाला विशेष सूचना देण्यात आल्याचे या वेळी आयुक्त देशमुख यांनी सांगितले. तसेच महापालिका क्षेत्रातील सर्वच नागरिकांना महापालिकेच्या मुख्य कार्यालयात येऊ लागू नये म्हणून महापालिका क्षेत्रातील विविध नोडमध्ये सुसज्य विभागीय कार्यालय  निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे त्या विविध भागात नागरिकांना जाऊन त्यांचे काम करणे सुकर होणार आहे. महापालिकेची होऊ घातलेली इमारतही सुंदर आकर्षक व सर्व सुखसोयींनी युक्त अधिकार्‍यांच्या बैठक व्यवस्था सभागृह आदींनी सुसज्ज अशी असणार आहे. त्यात पत्रकारांसाठी ही विशेष पत्रकार कक्षाची सोय केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Check Also

पनवेल भाजी मार्केटमध्ये इनरव्हील क्लबतर्फे कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे शहरातील कृष्णाळे …

Leave a Reply