Breaking News

स्वच्छ सर्वेक्षणात सक्रियपणे सहभाग घ्या

नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचे आवाहन

पेण : प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले.   महाराष्ट्र नागरी विकास अभियान विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत पेण नगर परिषद हद्दीतील हॉटेल, शाळा, रूग्णालये, निवासी संकुल, शासकीय कार्यालये, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणच्या स्वच्छतेबाबत नगर परिषदेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात निवड झालेल्या आस्थापनांचा सत्कार व बक्षिस वितरण समारंभ नगर परिशद सभागृहात ठेवण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील बोलत होत्या. या वेळी त्यांनी सर्वेक्षण अंतर्गत निवड झालेल्या सर्वांचे कौतुक केले. पेण नगर परिषदेची वाढती लोकसंख्या पाहता ठिकठिकाणी स्वच्छतेबाबतीत उपाययोजना करण्यात येत असून, त्याला नागरिकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही ठिकाणी अजुनही कचरा टाकला जात असून, अशा लोकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नगराध्यक्षा पाटील यावेळी म्हणाल्या. मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी, प्रास्ताविकात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आस्थापनांची कशाप्रकारे निवड करण्यात आली, याची माहिती दिली. या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा वैशाली कडू,  आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण, शहर समन्वयक विशाल सपकाळ आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आस्थापनेनुसार वर्गीकरण करून बक्षिसे देण्यात आली.

सर्वेक्षणात निवड झालेल्या आस्थापना

1) शाळा :

प्रथम क्रमांक पेण न. प. शाळा क्रमांक 8,

द्वितीय क्रमांक पेण न. प. शाळा क्रमांक 3,

तृतीय क्रमांक पेण न. प. शाळा क्रमांक 7

2) रूग्णालय :

प्रथम क्रमांक म्हात्रे हॉस्पिटल,

द्वितीय क्रमांक सिद्धकला हॉस्पिटल,

तृतीय क्रमांक महाजन हॉस्पिटल

3) हॉटेल :

प्रथम क्रमांक मंथन हॉटेल,

द्वितीय क्रमांक राजे शिवराय हॉटेल,

तृतीय क्रमांक समृद्धी हॉटेल,

4) गृहनिर्माण सोसायटी :

प्रथम क्रमांक युनायटेड गॅलेक्सी अपार्टमेंट

द्वितीय क्रमांक ईशान्य बिल्डिंग,

तृतीय क्रमांक निलकमल सोसायटी.

8) रस्ता :

प्रथम क्रमांक पेण-खोपोली रोड,

द्वितीय क्रमांक चिंचपाडा बायपास,

तृतीय क्रमांक अंतोरा फाटा ते पेण न.प.

9) पार्क :

प्रथम क्रमांक म्हाडा वसाहत उद्यान,

द्वितीय क्रमांक प्रेमनगर उद्यान,

तृतीय क्रमांक पानेरी सोसायटी उद्यान

5) शासकीय कार्यालय :

प्रथम क्रमांक पेण नगर परिषद,

द्वितीय क्रमांक पेण न्यायालय,

तृतीय क्रमांक आयटीआय,

6) बाजारपेठ :

प्रथम क्रमांक पेण कृषी उत्पन्न बाजार समिती.

7) रेल्वे स्थानक :

पेण रेल्वेस्थानक

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply