Breaking News

कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचा रक्तदानात पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त – लॉकडाऊन परिस्थितीत अनेक रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर आणि सदस्यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचातीच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात तब्बल 90 रक्तदात्यांनी रक्तदान करून योगदान दिले.

सद्यपरिस्थिती लक्षात घेता कोरोनाचे संकट जगभर आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे आणि राज्यात रक्तपुरवठा देखील कमी प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊन सरपंच सदाशिव वास्कर यांच्या पुढाकाराने आणि उपसरपंच करिष्मा वास्कर आणि सदस्यांच्या सहकार्याने नियमांचे सोसिएल डिस्टन्सिंगचे पालन करून हे शिबिर नियोजनबद्ध पार पडले. या शिबिरासाठी एमजीएम कामोठे रुग्णालयाचे, तसेच पोलीस उपनिरीक्षक दीपक कादमाने, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचबरोबीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये धूर फवारणी आणि कोविड 19 औषधफवारणी करून स्वच्छता राखण्यात आली आहे. या एकूणच स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून या ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.

त्याचबरोबरीने कान्होबा दगडखाण चालक  मालक संघटना व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य विनोद भोईर, दत्तात्रेय पाटील, संगीता रमण वास्कर, जागृती संदीप वास्कर, ऋषिकेश वास्कर यांनी एकत्रित येऊन देणगी जमा करून 600 गरजू नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटपकरण्यात आले आहे. कुंडेवहाळमधील खैराचीवाडी, तसेच दंडाचीवाडी बंबावीपाडा, बंबावी कोळीवाडा व कुंडेवहाळ येथील गरजूंना वाटप करण्यात आले. ग्रामस्थ, सरपंच यांच्या तर्फे संघटनेचे अध्यक्ष सुनिल भोईर व सर्व  क्रेशर व्यावसायिक देणगीदारांचे आभार व्यक्त

करण्यात आले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply