Breaking News

दोन तासांसाठी विद्युत पुरवठा होणार खंडित

नागरिकांनी सहकार्य करण्याचे महावितरणकडून आवाहन

पनवेल : वार्ताहर – पनवेल शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसापासून वीज वाहिन्यांच्या जवळील झाडे वाढल्यामुळे विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यासाठी उपाय योजना म्हणून दररोज 10 ते 12 या वेळेत विद्युत पुरवठा खंडित करून सदर झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम करण्यात येणार आहे. तरी यासाठी वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण पनवेलचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी केले आहे.

गेल्या तीन ते चार दिवसापासून वीज वाहिन्यांजवळील झाडे वाढल्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्या तोडणे आवश्यक झाले आहे. अन्यथा वीज जाण्याचे प्रकार वाढतील म्हणून पनवेल कार्यालयाच्या मार्फत कामगार उपलब्ध होतील तसे झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे. शहरातील थोडा-थोडा भाग दोन तासासाठी बंद करून हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ही कामे सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे, असे केल्याने विद्युत पुरवठा आगामी काळात सुरळीत होईल तरी वीज ग्राहकांनी होणार्‍या गैरसोयीबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जयदीप नानोटे यांनी केले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply