Breaking News

अपहृत बालकाची 12 तासांत सुटका

पनवेल तालुका पोलिसांची कामगिरी; बालकाला नातेवाईकांकडे केले सुपूर्द

पनवेल : संजय कदम

दोन वर्षाच्या अल्पवयीन अपहृत बालकाची पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 12 तासाच्या आत सुटका केल्याने तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे.

अधिक वृत्त असे, तळोजा पोलीस ठाण्याचे व.पो.नि. जितेंद्र सोनावणे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे व.पो.नि. रविंद्र दौडकर यांना या घटनेची माहिती दिली. यावेळी पोलीस ठाणे नेमणुकीतील पो.शि. संदेश उत्तेकर यांना ही खबर मिळाली त्यानुसार एका महिलेने अल्पवयीन बालकास अपहरण करुन त्यास भिंगारवाडी, ता. पनवेल येथे लपवून ठेवले आहे व तिच्या सोबतच्या मोबाईलनंबर संदर्भात माहिती मिळाली. ही माहीती मिळताच तात्काळ वपोनि रविंद्र दौंडकर यांनी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-1, वाशी नवी मुंबई व सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सपोनि संजय गळवे व पथकास प्राप्त बातमीची शहानिशा करणेकामी रवाना केले. या माहितीवरुन या पथकाने तांत्रिक तपास करुन प्राप्त माहितीच्या आधारे खानावळे वाडी, बोधलेवाडी आदिवासी पाडा, खानावळे येथुन महिलेस ताब्यात घेतले व तिच्याकडे अपहृत बालकाबाबत चौकशी केली असता तिने अपहृत मुल स्वत:च्या घरात लपवुन ठेवल्याचे सांगितले. तात्काळ मपोशि घरत हिच्या मदतीने अल्पवयीन मुलगा वय अंदाजे 2 वर्षे यास ताब्यात घेवून त्याची यशस्वीरित्या सुखरूप सुटका केली. तसेच महिला आरोपी नामे शेवंता एकनाथ कातकरी (वय 30, रा. कातकरवाडी, वाजेपुर) हिला ताब्यात घेण्यात आले. तिची चौकशी करता तिने सदरचे बालक हे रेल्वे बुकिंग ऑफीसजवळ, पनवेल रेल्वे स्टेशन, पनवेल येथुन पळवुन आणल्याचे सांगितले. याबाबत पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. तात्काळ सदरची माहिती पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक पाडवी यांना देण्यात आली. त्यांनी अल्पवयीन मुलाचे आई-वडीलांना समक्ष पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे आणले व त्यांच्याकरवी खात्री करून हे बालक त्यांचाच मुलगा असल्याचे सांगितले व त्यांनी नवी मुंबई पोलीस व रेल्वे पोलिसांचे आभार मानले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग भागवत सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र दौडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पो. ठाणे, जितेंद्र सोनावणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा पो. ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा पोलीस निरिक्षक संजय गळवे, पो.हवा. महेश् धुमाळ, पो.ना. पंकज चंदिले, पो.ना. प्रकाश मेहेर, पोहवा विकास साळव पो.ना. जयदिप पवार, पो.ना. वैभव शिंदे, पो. शि. संदेश उत्तेकर भिंगारवाडीचे पोलीस पाटील संतोष गायकर पथकाने केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनचे पो.नि. प्रविण पाडवी करीत आहेत.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply