नवी मुंबई : बातमीदार
वाशी एपीएमसीतील धान्य मार्केटमधील एका व्यापार्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बाजारातील अन्य व्यापार्यांसह माथाडी कामगार, वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा व्यापारी सानपाड्यातील पामबीचजवळ राहतो. त्याला उपचारासाठी वाशीच्या मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मसाला मार्केटमधील व्यापार्यास कोरोनाची लागण झालेली आहे.
धान्य मार्केटमध्ये गुरुवारी डाळी आणि तीनशे ते सव्वातीनशे धान्य गाड्यांची आवक आली, तर शुक्रवारी मुंबईतील कडधान्य पुरवठा करणारे व्यापारीही बाजारात वाहतुकीसाठी आले होते, मात्र धान्य मार्केटमधील आणखी एका व्यापार्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच जवळपास 80 टक्के व्यापारी निघून गेले. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईला कडधान्य पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नवी मुंबईत दिवसभरात पाच रुग्ण वाढले. त्यामुळे एकूण संख्या 59वर पोहोचली आहे. देशातील हॉटस्पॉट भागामध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …