रोहे : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी रोहेकरांनी आतापर्यंत लॉकडाऊन चालू झाल्यापासून प्रतिसाद दिला, परंतु आता लॉकडाऊन 3 मेपर्यंत गेल्याने रोह्यातसुद्धा नागरिकांनी या कालावधी टप्प्याटप्प्याने नियोजन केले आहे.
रोहे-अष्टमीत 18, 19, 20 व त्यानंतर 25 एप्रिल दुपारी 2 वाजल्यापासून 26 एप्रिल पूर्ण दिवस, 27 एप्रिल आणि त्यानंतर 1 मे दुपारी 2 वाजल्यापासून 2 व 3 मे पूर्ण दिवस लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुध डेअरी सकाळी 6 ते 11.30 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरू राहतील, तर मेडिकल शॉप दिवसभर सुरू राहातील, पण तेथेही सोशल डिन्स्टन्सिग पाळणे आवश्यक आहे.
या कालावधीत रमझान महिना येत असल्याने थोडसा बदल करण्यात आला आहे. 26 व 27 एप्रिल, 1, 2 व 3 मे रोजी लॉकडाऊन काळात रोहा खालचा आणी वरचा मोहल्ला तसेच अष्टमी मोहल्ल्यांमध्ये तीन ठिकाणी पाच-सहा भाजीची दुकाने आणी फळांच्या सहा-सात गाड्या लावायला तसेच मोहल्ल्यात असणारी लहान किराणा दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, पण या सर्व ठिकाणी सोशल डिन्स्टन्सिग पाळून विनाकारण गर्दी होता कामा नये. नाही तर नाईलाजाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
खोपोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असूनही लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. अशांवर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई होऊनही विविध कारणे सांगत फिरणार्यांची संख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. यावर उपाय म्हणून खोपोलीत स्वयंस्फूर्तीने 18 ते 20 एप्रिल असा तीनदिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. या तीन दिवसांत मेडिकल व दुध डेअरी सोडून अन्य सर्व दुकाने व आस्थापने शंभर टक्के बंद राहणार आहेत.
खोपोली व परिसरात कोरोनाला रोखण्यासाठी तीन दिवस पूर्णत: संचारबंदी पाळण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. खोपोली व शीळफाटा व्यापारी असोसिएशन, भाजीपाला विक्री संघ, शहरातील विविध सामाजिक संस्था, सर्वपक्षीय नेते व लोकप्रतिनिधींची विशेष बैठक होऊन हा तीन दिवस सर्व बंद चा निर्णय घेण्यात आला. याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांचेही मार्गदर्शन घेण्यात येऊन माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे आपत्कालीन स्थितीत मदतीची तयारी व नियोजन प्रभावी करण्याची विनंती करण्यात आली असून या बंदला अधिकारी वर्गाकडूनही संमती मिळाली आहे.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …