Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने यापुढेही प्रशासनाला सहकार्य करावे

आमदार महेश बालदी यांचे आवाहन

उरण : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेने एकदिलाने शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तशाच प्रकारचे सहकार्य लॉकडाउनच्या पुढील काळातही करावे, असे आवाहन उरणचे आमदार महेश बालदी यांनी मतदारसंघातील जनतेला केले आहे.
मुंबई, नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर या शहरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरणच्या जनतेने घाबरून न जाता कोरोनाला आपल्या वेशीवर रोखून ठेवण्यासाठी एकदिलाने शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रशासकीय व पोलीस यंत्रणेतील शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी लॉकडाऊनच्या काळातही आपली ड्युटी अविरत सुरू ठेवली आहे, तर दुसरीकुडे विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांनी आदिवासी, भटक्या घटकांना आणि परिसरातील रोजंदारी, मोलमजुरी करणार्‍यांना जीवनावश्यक वस्तूंचे तसेच मास्क, सॅनिटायझरसह इतर मेडिकल साहित्याचे मोफत वाटप केले. या माझ्या जनतेचा निश्चितच मला त्यांचा सेवक म्हणून अभिमान वाटत आहे, असे आमदार महेश बालदी यांनी नमूद केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटातून देशबांधवांना वाचविण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी आता 3 मेपर्यंत वाढविला आहे. जनतेची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ते ध्यानात घेऊन उरणच्या जनतेने तोंडाला मास्क लावून कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सोशन डिस्टन्सिंगचे पालन करून पोलीस यंत्रणा, प्रशासन, वैद्यकीय सेवा बजावणार्‍यांना सहकार्य करावे. तरच आपण कोरोनाला पुढील काळात हरवू शकतो, असा विश्वासही आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply