Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग क्लासेस

उरण : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे दहावीच्या मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. उरण तालुक्यातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्याचा महत्त्वाचा वेळ वाया जावू नये, या करिता हे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रथमच स्कूल सेक्शनसाठी ऑनलाइन आणि लाईव्ह क्लास सोमवार (दि. 20) पासून सकाळी 9 ते 12 असे सुरू करण्यात येणार आहेत. ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली लाखो रुपये फी घेतली जाते. सामान्य माणूस ती फी भरू शकत नाही, म्हणून प्रा. राजेंद्र मढवी यांनी पूर्ण सेट-अप स्वखर्चाने तयार केला आहे.

हे क्लासेस विद्यार्थ्यांसाठी ते स्वतः मोफत घेणार आहेत. विद्यार्थ्याला फक्त आपले नाव आणि मोबाइल नंबर प्रा. राजेंद्र मढवी यांच्या मोबाइल वर पाठवायचा आहे. जेणे करून ते तुम्हाला ते 20 एप्रिलला सुरू होणार्‍या बॅचमध्ये अ‍ॅड करून घेतील. त्यानंतर वैष्णवी अ‍ॅकॅडमी लिव्ह सेशन र्(ींरळीहपर्रींळ रलरवशू श्रर्ळींश ीशीीळेप)हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून आपला मोबाईल नंबर रजिस्टर करू शकता. आणि निश्चिंतपणे लाईव्ह लेक्चर्स पाहू शकता.

प्रा. राजेंद्र मढवी (च.ढशलह, चइअ) हे शिक्षण क्षेत्रात गेली 20 वर्षे निरंतर अध्ययन करत असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत वैष्णवी अ‍ॅकॅडमी या संस्थेने सर्व इंजिनीअरिंग कोचिंग क्लासेसला मागे टाकत  इंजीनीयरींगच्या शिक्षण पद्धती मधिल स्वतःचा एक ट्रेन्ड प्रस्थापित केलेला आहे. याबद्दल त्या संस्थेला टाईम्स ऑफ इंडिया न्यु ट्रेन्ड सेंटर एन्टरप्रेन्यूअर अवॉर्डने सन्मानित केले आहे. आपला सामाजिक पिंड जपत त्यांनी सर्व ग्रामीण, शहरी मुलांना मोफत कोंचीग क्लासेस सुरू केले आहेत.

इयत्ता 10 वीला असणार्‍या व प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या मुलांसाठी ते ऑनलाइन मोफत कोंचीग क्लासेस घेत आहेत. हि विद्यार्थ्यांसाठी प्रा. राजेंद्र मढवी यांनी अनमोल अशी संधी

उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचा लाभ गरजू विदयार्थ्यांनी घेणे आवश्यकच आहे. सर्व शाळेच्या प्राचार्यांनी तसेच शिक्षकांनी ही माहिती आपल्या सर्व दहावीच्या मुलांपर्यंत पोहोचवावी. अधिक माहिती करिता संतोष पवार 9619326944, प्रा. राजेंद्र मढवी 9967096513 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply